ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य


ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य

ठाणे खाडीचे पुरेसे पर्यावरण, प्राणी, वनस्पती, भूभाग, नैसर्गिक आणि प्राणीशास्त्रविषयक महत्त्व, प्रजातींमुळे २००४ साली ठाणे खाडी महत्वाचे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर दिनांक 06 ऑगस्ट 2015 च्या अधिसूचनेद्वारे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य घोषित करण्यात आले. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य क्षेत्र ऐरोली ब्रिज ते वाशी ब्रिज यांच्यातील खाडीच्या पश्चिमेकडील भाग आहे. ठाणे खाडी हजारो प्रवासी फ्लॅमिंगोज आणि इतर पाणथळ पक्ष्यांच्या २०५ प्रजातींचा अधिवास आहे. पाणथळ पक्ष्यांसाठी आवश्यक असणारे खाद्य ठाणे खाडी परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे ठाणे खाडी महत्वाचे क्षेत्र आहे.

"ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य" ची स्थिती आणि मर्यादा

  • ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य
  • विभाग: कांदळवन कक्ष मुंबई
  • मुंबई उपनगर जिल्यात पसरलेले
  • GPS Readings : ७२o५५' ते ७३o००' पु आणि १९o००' ते १९o१५' उ
  • एकूण क्षेत्र : १६९०.५२५ हेक्टर

"ठाणे खाडी फ्लॅमिंगो अभयारण्य“ च्या सिमा

गाव उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम
मुलुंड कोपरी गाव सिमा खाडी भांडुप गाव सिमा सी टी एस नंबर .१३२१, १३२०, १३१९ , १३१८
विक्रोळी कांजूर गाव आणि खाडी च्या सिमा खाडी खाडी सी टी एस नंबर. १
भांडुप नाहूर गाव सिमा खाडी खाडी सर्वे क्र. ६३
कांजूर भांडुप गाव सिमा खाडी व्ही बी विक्रोळी सर्वे क्र. २७५
मंडाले खाडी खाडी सायन-पनवेल महामार्ग तुर्भे गाव सिमा सी टी एस नंबर. ६ पै

अभयारण्य मध्ये एकत्रित केलेल्या राखीव जंगले आणि खाडी क्षेत्र

  • हेक्टर क्षेत्रफळ. १६९०.५२५५
जिल्हा तालुका गाव
   मुंबई उपनगर जिल्हा         कुर्ला         मुलुंड, विक्रोळी, भांडुप, कांजूर, मंडाले  

ठाणे खाडीचा फ्लेमिंगो
अभयारण्य